Posts

आत्मविश्वास

आत्मविश्वास ... आयुष्यात success होण्यासाठी आत्मविश्वासाची खूप गरज भासते. बर्याचदा काही नकारात्मक गोष्टी आयुष्यात घडत असतात अशावेळी आपण आपला आत्मविश्वास गमावून बसतो .एकदा आपण आतापर्यंत जे मिळवलं, जे गमावलं ते स्विकारलं की नव्याने सुरूवात करता येते. सद्यस्थिती बदलण्यासाठी 'गेलेला काळ आता विचार करून बदलता येणार नाही. तेव्हा भविष्यकाळ आणि वर्तमानकाळ यावरच माझी सत्ता चालणार आहे' हे आधी स्वतःशी मान्य करायला हवे. आता, आत्मविश्वासाविषयी. आत्मविश्वासासाठी कुठलेही औषध नाही की कसले उपचार नाहीत. स्वतःवर प्रेम करायला लागणे, ज्या गोष्टींमुळे आनंद मिळतो त्या करायला लागणे आणि प्रत्येक काम मन लावून, श्रमांचा आनंद घेत करणे व तयारीपुर्वक जीवनाच्या प्रत्येक परीक्षेला सामोरे जाणे ह्यामुळे आत्मविश्वास नक्कीच वाढू शकेल. स्वतः स्वतःला आवडणे हे आनंदाचे निधान आहे. सतत प्रगती, सतत सर्वोत्तम निर्माण करण्याचा ध्यास घ्या आणि करा बिनधास्त वाट्टेल ते. लोकांना फाट्यावर मारा आणि आत्मविश्वासाने आपले काम करा.

प्रेरणा : एक आंतरिक शक्ति

मानवी जीवन जगत असताना आपल्याला अनेकदा विविध भूमिका पार पाडाव्या लागतात. त्या भूमिका पार पाडत असताना बर्‍याचदा आपल्याला निर्णय घेण्याची गरज पडत असते. हेच निर्णय घेण्यासाठी तसेच आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्याला प्रेरणेची गरज भासते. प्रेरणा ही कोणतेही कार्य करण्यासाठी आपल्याला एक बळ देते. याच प्रेरणेने वेगवेगळ्या परिस्थितीचा सामना करणे सोपे जाते. एखादा अवघड निर्णय घेणही यामुळे शक्य होतं. प्रेरणेच्या बळावरच अनेक लोकांनी इतिहास रचला. माणसाला काहीही करण्यासाठी एक आंतरिक शक्ति मदत करते तिलाच प्रेरणा असे म्हणतात . दुर्गम भागात जेथे शिक्षणाची सोय नाही अशा अवस्थेत मैल न मैल प्रवास करून शिक्षण घेऊन कष्ट सोसून एखाद्याने त्या क्षेत्रात नाव करावं हे फक्त प्रेरणेमुळेच शक्य होते. प्रेरणा निर्माण झाली म्हणजे ती पूर्ण करण्यासाठी माणूस धडपड करू लागतो व त्यामुळेच ती प्रेरणा पूर्ती होऊन त्याला त्या प्रयत्नाचे समाधान मिळते. अर्थात या प्रेरणा जैविक , सामाजिक किंवा अबोधही असू शकतात . कोणत्याही विशिष्ट वर्तनाच्या मुळाशी असलेली कारणे सहजपणे दिसून येत नाहीत तेव्हा हे वर्तन विशिष्ट प्रेरणांमुळे घडून आलेल

मनातलं थोडं (चारोळया)

1  तुझं जादुभरीत हसणं     माझा थांबलेला श्वास तुझे भिरभिरते डोळे मला जिवंतपणीचा भास.... 2  मला काहीच आठवलं नाही की, मी तिच्याकडे पाहतो मग मला आठवायला मी माझ्यात कुठे राहतो... 3 तू दिलेलं मोरपीस मी जिवापाड जपलाय, तुला देतांना पहिलं म्हणून उभा गाव तापलाय... 4 तू उडायची पाखरासारखी पाखरं बसायची रुसून तू भुलवायची पाखरांना गालातल्या गालात हसून...

नाते मातीशी.......

शिखरावर जाण्यासाठी पहिली पायरी महत्वाची असते........ मातीशी नाळ जोडल्याशिवाय कोणीही मोठा होऊ शकत नाही, माणूस कितीही मोठा झाला तरी मातीला विसरून चालत नाही जो मातीला विसरला त्याची माती करायला मातीला वेळ लागत नाही आभाळात उडण्यापेक्षा मातीवर पाय रोवून चालणे अधिक चांगले....आभाळात उडणारला खाली पडण्याची भीती असते, पण जमिनीवरून चालणारा त्यापेक्षा खाली जाऊ शकत नाही. कारण माती त्याला सांभाळून घेते त्याची माती होण्याआधी........!