आत्मविश्वास

आत्मविश्वास...

आयुष्यात success होण्यासाठी आत्मविश्वासाची खूप गरज भासते. बर्याचदा काही नकारात्मक गोष्टी आयुष्यात घडत असतात अशावेळी आपण आपला आत्मविश्वास गमावून बसतो .एकदा आपण आतापर्यंत जे मिळवलं, जे गमावलं ते स्विकारलं की नव्याने सुरूवात करता येते. सद्यस्थिती बदलण्यासाठी 'गेलेला काळ आता विचार करून बदलता येणार नाही. तेव्हा भविष्यकाळ आणि वर्तमानकाळ यावरच माझी सत्ता चालणार आहे' हे आधी स्वतःशी मान्य करायला हवे. आता, आत्मविश्वासाविषयी. आत्मविश्वासासाठी कुठलेही औषध नाही की कसले उपचार नाहीत. स्वतःवर प्रेम करायला लागणे, ज्या गोष्टींमुळे आनंद मिळतो त्या करायला लागणे आणि प्रत्येक काम मन लावून, श्रमांचा आनंद घेत करणे व तयारीपुर्वक जीवनाच्या प्रत्येक परीक्षेला सामोरे जाणे ह्यामुळे आत्मविश्वास नक्कीच वाढू शकेल. स्वतः स्वतःला आवडणे हे आनंदाचे निधान आहे. सतत प्रगती, सतत सर्वोत्तम निर्माण करण्याचा ध्यास घ्या आणि करा बिनधास्त वाट्टेल ते. लोकांना फाट्यावर मारा आणि आत्मविश्वासाने आपले काम करा.

Comments

Popular posts from this blog

नाते मातीशी.......

प्रेरणा : एक आंतरिक शक्ति