मनातलं थोडं (चारोळया)
1
तुझं जादुभरीत हसणं
माझा थांबलेला श्वास
तुझे भिरभिरते डोळे
मला जिवंतपणीचा भास....
2
मला काहीच आठवलं नाही की,
मी तिच्याकडे पाहतो
मग मला आठवायला मी
माझ्यात कुठे राहतो...
3
तू दिलेलं मोरपीस
मी जिवापाड जपलाय,
तुला देतांना पहिलं म्हणून
उभा गाव तापलाय...
4
तू उडायची पाखरासारखी
पाखरं बसायची रुसून
तू भुलवायची पाखरांना
गालातल्या गालात हसून...
Comments
Post a Comment