मनातलं थोडं (चारोळया)
1 तुझं जादुभरीत हसणं माझा थांबलेला श्वास तुझे भिरभिरते डोळे मला जिवंतपणीचा भास.... 2 मला काहीच आठवलं नाही की, मी तिच्याकडे पाहतो मग मला आठवायला मी माझ्यात कुठे राहतो... 3 तू दिलेलं मोरपीस मी जिवापाड जपलाय, तुला देतांना पहिलं म्हणून उभा गाव तापलाय... 4 तू उडायची पाखरासारखी पाखरं बसायची रुसून तू भुलवायची पाखरांना गालातल्या गालात हसून...